Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचे त्यांच्यासोबत असलेल्या नांत्याविषयी प्रश्न विचारले. त्यावर 'घरी आम्ही सर्व एकत्र असतो', अशी प्रतिक्रीया शरद पवार(Shadar Pawar) यांनी दिली. काका-पुतण्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी मागणी “राज्यातील विविध स्तरातून” केली जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. (हेही वाचा: Sharad Pawar On PM Modi's 'Wandering spirit' Remark: 'जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहीन'... PM Modi यांच्या 'भटकती आत्मा' च्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर)
गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीपासून वेगळं होतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सत्ताधारी गटात नाराजीचे सुरू उमटत असल्याने अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे वळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकीचा होता, असे अजित पवार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी म्हटले होते त्यावर शरद पवारांना प्रश्न केला असता 'ते वेगळ्या पक्षात आहेत. दुसऱ्या पक्षाने घेतलेल्या निर्णयांवर आपण भाष्य का करावे?', असे शरद पवार यांनी म्हटले.
त्याशिवाय, जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात 'प्राण्यांची चरबी' तसेच माश्याचे तेल वापरल्याचा आरोप करण्यात आला आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तसा दावा केल्याबाबत विचारले असता “काहीही मिसळले असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली.