API Suicide Case: सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद मळाळे असं आत्महत्या करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र परिसरात कामाचा ताण असल्यामुळे आत्महत्या केली असं चर्चा चालू आहे. आनंद मळाळे हे नांदेड येथे कार्यरत होते. आजारी असल्यामुळे ते रजेवर होत आणि सोलापूरातील घरी आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारच्या पहाटे ते घराबाहेर आले होते. यावेळी त्यांनी सर्विस रिवाल्वमधून डोक्यात गोळी झाडली आणि आयुष्य संपवलं. गोळीचा आवाज ऐकताच त्यांची पत्नी घरा बाहेर आली. अंगणात त्यांनी आंनद हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे पाहताच त्यांना आक्रोश केला. घटनेची माहिती सोलापूर पोलीसांना देण्यात आली. सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती नांदेड पोलीस ठाण्यात देण्यात आली.मृत आनंद मळाळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. मळाळे यांच्या मृत्यूची बातमी कळताच नांदेड पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे.