आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे सालाबादप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मीणी शासकीय महापूजा (Shaskiya Mahapuja 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. आषाढी एकादशी निमित्त आपल्या सावळ्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा चंद्रभागा वाळवंटी जमला आहे. पाठमागील अनेक दिवसांपासून लक्षवधी वारकऱ्यांच्या मनात लागलेली पांडूरंग दर्शनाची आस आज पूर्ण होत आहे. टाळ, मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी भजन, कीर्तन आणि विठोबा-रखुमाईचा जयघोष करत पंढरपुरात दाखल झाले आहेत. भक्तीरसात चिंब झालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात मुख्यमंत्र्यांनी पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली. दरम्यान, या वेळी अहमदनगर येथील काळे दाम्पत्याला महापूजेचा मान भेटला.
राज्याला सुखासमाधानाचे दिवस यावेत. राज्यातील बळीराजा समाधानी व्हावा यासाठी यंदा पर्जन्यमान चांगले राहावे असे साखडे आपण विठूरायाला घातले असल्याचे मख्यमंत्री शिंदे यांनी महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातील जनताही सुखी आणि समाधानाची राहावी, अशी प्रार्थना विठूचरणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Ashadi Ekadashi 2023 HD Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes, WhatsApp Status, Photos शेअर करून द्या विठ्ठल- रूक्मिणी भक्तांना द्या शुभेच्छां)
ट्विट
सावळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे
आणिक कांही इच्छा,
आम्हां नाहीं चाड
तुझें नाम गोड, पांडुरंगा |#आषाढी_एकादशी च्या दिवशी #विठ्ठल #रखुमाई ची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य मला मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची… pic.twitter.com/AL6eOOy0ag
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी विरोधकांच्या टीकेलाही खोच प्रत्युत्तर दिले. आपण सामान्य कार्यकर्ता आहोत. राज्यातील जनतेची सेवा करण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वसामान्या नागरिकांच काम होईल, राज्यांचा विकास होईल असा माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. त्याउलट विरोधकांकडे मात्र आरोप करण्याशिवाय दुसरं कोणतंच काम नाही. केवळ आरोप आणि टोमणे इतकंच काम असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: On the occasion of Ashadi Ekadashi, CM Eknath Shinde offers prayers at Vitthal Rukimini temple in Pandharpur pic.twitter.com/kB0JjDKdN6
— ANI (@ANI) June 28, 2023
पंढरपूर मंदिर विकास आराखड्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांना विश्वासात घेतले जाईल. विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये शिंदे यांनी सांगितले. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीतून त्यांना दिलासा मिळाला आहे, असे ते या वेळी म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी रुपये आणि शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. दरम्यान, या वेळी अहमदनगर येथील काळे दाम्पत्याला महापूजेचा मान भेटला.