Ashadhi Ekadashi 2020: राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, पाहा ट्विट
Sharad Pawar, Ajit Pawar, Raj Thackeray, Nitin Gadkari, Supriya Sule (Photo Credits: PTI)

'जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात आज सारा आसंमत दुमदुमून गेला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्रावर कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूचे सावट असले तरीही आजच्या दिवसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्यमय वातावरण निर्णाण झाले आहे. यंदा कोरोनामुळे पंढपूरच्या वारी जरी होऊ शकली नाही तरी विठूरायाचे भक्त घरात राहून विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. म्हणून आजच्या या मंगलमयी दिनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सर्व जनतेला आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेची सांस्कृतिक ठेव, भक्तीरसाची अनुभूती देणाऱ्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामाजिक एकोपा वृद्धींगत करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाच्या सर्व विठ्ठलभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात यंदा चांगला पाऊस होऊ देत, बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू देत! तसंच ‘कोरोना’चं संकट दूर करून सर्वांना चांगलं आरोग्य दे अशी विठु चरणी प्रार्थना केली.

तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशावरच्या ह्या कोरोनाच्या संकटाचं लवकर निवारण होऊ दे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. Ashadhi Ekadashi 2020 Mahapuja: विठूराया आम्हाला चमत्कार दाखव, तोंडाला पट्टी बांधून जीवन कसं जगायचं?, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सर्वांना ट्विटच्या माध्यमातून आषाढी एकदशीच्या शुभेच्छा दिल्या.

हेदेखील वाचा- Ashadhi Ekadashi 2020 Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes, HD Wallpaper, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरा करा विठुरायाचा उत्सव!

आजच्या दिवशी विठुराच्या दिंड्या निघतात. विठ्ठलाचे अभंग- भजने गायली जातात. प्रत्येकाच्या मुखातून फक्त विठुरायाचे कौतुक आणि रुपाचे वर्णन करण्यात येते. परंतु यंदा कोरोनाचे वारीवर सावट असल्याने ती रद्द करण्यात आली आहे.