Ashadhi Ekadashi 2020 Mahapuja: विठूराया आम्हाला चमत्कार दाखव, तोंडाला पट्टी बांधून जीवन कसं जगायचं?, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra )

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा सपत्नीक केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ' विठूराया आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?', असे म्हणत विठ्ठलाला साकडे घातले. शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? मी साकडं घातलं आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो.' (शासकीय महापूजेचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, वारकरी आणि विठ्ठलमंदिरातील काही मोजके पुजारी उपस्थीत होते. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना मार्गदर्शन केले.