Hoardings of Rape Convict Asaram Bapu Surface in Delhi Metro, Navi Mumbai (Photo Credits: X/ @SwapnilSaurav12, @sumitsharma_87)

दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) 14 फेब्रुवारीच्या पालक दिनानिमित्त लावण्यात आलेल्या एका जाहिरावर आसाराम बापूचा (Rape Convict Asaram Bapu) फोटो छापण्यात आला होता. त्यावर लिहिले होते- ‘पूज्य संत आसाराम बापूंपासून प्रेरित’. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेक मेट्रो प्रवाशांनी सोशल मिडियावर आपली नाराजी व राग व्यक्त केला होता. मेट्रोमध्ये दररोज लाखो महिला प्रवास करतात, अशात बलात्कारी आसारामचा फोटो मेट्रोमध्ये का लावण्यात आला? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. त्यानंतर सोशल मीडियावरील वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने मेट्रो परिसरातून या जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले. आता त्यानंतर काही दिवसांनी, महाराष्ट्रातील नवी मुंबईतही (Navi Mumbai) असेच होर्डिंग्ज झळकले आहेत.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी दोषी बलात्कारी आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या आसाराम बापूचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहे. आता या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुमित शर्मा नावाच्या एका स्थानिक रहिवाशाने आसाराम बापूच्या या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करून ते वाशी आणि कोपर खैरणेच्या रस्त्यांवर लावल्याचे निदर्शनास आणून दिले. वाशी रेल्वे स्थानकाजवळ आणि गर्दीच्या शहरातील महत्त्वाच्या बस थांब्यांजवळ हे होर्डिंग्ज लावलेले दृश्यांमध्ये दिसत होते.

सुमितने या प्रकरणाचा निषेध केला आणि शहर प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची मागणी केली. बलात्कारी आणि तुरुंगवास भोगत असलेल्या आरोपीचे उघडपणे होर्डिंग्ज लावण्याच्या कृत्यावर टीका करताना त्याने यावर कारवाईची मागणी केली. जाहिरातींवरील संदेशामध्ये 14 फेब्रुवारी रोजी 'पालकांचा पूजन दिन' साजरा करण्याबाबत आवाहन केले आहे. हा दिवस जागतिक स्तरावर ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा; Maharashtra Shocker: 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, नराधमांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर केला व्हायरल)

Asaram Bapu Ads in Navi Mumbai:

दरम्यान, 2013 मध्ये, स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला त्याच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गांधीनगर सत्र न्यायालयाने त्याला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला. 18 डिसेंबर 2024 पासून तो 17 दिवसांच्या पॅरोलवर होता आणि जानेवारीच्या सुरुवातीला तो पुन्हा तुरुंगात परतला. आता, तो पुन्हा वैद्यकीय कारणांमुळे बाहेर आला आहे. लाईव्ह लॉच्या एका वृत्तानुसार, तो वैद्यकीय उपचारांसाठी 31 edededededed9 eded मार्चपर्यंत अंतरिम जामिनावर आहे.