अभिनेता  Sumeet Raghvan ला खटकला Aamir Khan चा हिंदी जाहिरातीमधील  'शिंदे' आडनावाचा चूकीचा उच्चार; ट्वीट करत नोंदवला आक्षेप!
Sumeet Raghvan, Aamir Khan (Photo Credits: Instgram, PTI)

हिंदी सिनेमा आणि जाहिरातींमध्ये मराठी आडनावांची 'वाट' लावली जाते अशा आशयाचं एक ट्वीट करत अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) याने बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खान (Aamir Khan) च्या 'शिंदे' आडनावाच्या चूकीच्या उच्चारावर बोट ठेवलं आहे. आमिर खानची 'PhonePe' ची जाहिरात सध्या सुरू आहे. यामध्ये आमिरने 'शिंदे'चा उच्चार 'शिंडे' असा केला आहे. लेखक, सहाय्याक दिग्दर्शक, क्रु मेंबर्स ते अगदी एजंसी आणि प्रोडक्शन हाऊस कुणालाच 'शिंदे' चा योग्य उच्चार ठाऊक नाही? 'शिंदे' चा उच्चार इतका कठीण आहे का? असा प्रश्न विचारत त्याने खटकलेली गोष्टी ट्वीटरच्या माध्यामातून व्यक्त केली आहे.

दरम्यान सुमित राघवन हा मूळचा तमिळ असूनही मराठी उत्तम बोलतो. हिंदी सिनेमा आणि जाहिरातींसोबतच त्याने अनेक मराठी सिनेमे, नाटकं यामधून काम केले आहे. सुमितची दोन्ही मुलं मराठी माध्यमात शिकली आहेत तर पत्नी चिन्मयी देखील मराठी शाळा वाचवा, शालेय शिक्षण मातृभाषेत व्हावं यासाठी जनाजागृतीच्या उपक्रमासाठी काम करते.

सुमित राघवन चं ट्वीट

आमिर खानची जाहिरात

PhonePe च्या जाहिरातीमध्ये आलिया भट आणि आमिर खान एकत्र दिसले आहेत. यामध्ये पोलिसांच्या भूमिकेत असलेला आमिर त्याच्या सहाय्यकाला प्रश्न विचारताना 'शिंदे' चा उच्चार ' शिंडे' असा करतो. दरम्यान ही जाहिरात सुरक्षित डिजिटल पेमेंट बाबत आहे.

आमिर खान मागील काही वर्षांपासून मराठीची शिकवणी घेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याचे मराठीचे शिक्षक यांचे निधन झाले आहे.