महाराष्ट्रात नानासाहेब धर्माधिकारी यांचा वारसा जपत समाजकार्य पुढे नेणारे अप्प्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचा आज महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) पुरस्कार देऊन गौरव केला आहे. खारघर मध्ये अमित शाह यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. त्यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार असल्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह मिळालेली 25 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Chief Ministers Relief Fund Maharashtra) दान केली आहे. पुरस्काराच्या स्वरूपामध्ये शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25 लाख रूपयांचा समावेश असतो. त्यामधील ही रक्कम दान करत अप्पासाहेबांनी आपलं दातृत्त्व दाखवलं आहे.
दरम्यान महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केल्या. “पुरस्कार नेहमी मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला देण्यात आला कारण कार्य श्रेष्ठ आहे. हा कार्याचा सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना देतो. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुकच आहे” असे अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवताना पाहण्यासाठी त्यांच्या अनुयायींनी खारघर मध्ये मोठी गर्दी केली होती. सुमारे 10-15 लाख जण कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. नक्की वाचा: Maharashtra Bhushan Award: नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन; कार्यक्रमानिमित्त 15 व 16 एप्रिल रोजी वाहतुकीत बदल, घ्या जाणून .
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू करण्यात आले. सुरुवातीला हा पुरस्कार साहित्य, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जात होता, पण कालांतराने त्यामध्ये बदल करून आता सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमधील विशेष उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तीला सरकारकडून पुरस्कार प्रदान केला जातो.