Elderly Couple Dies By Suicide: कांदिवली पूर्व येथे नैराश्याने ग्रस्त वृद्ध जोडप्याची आत्महत्या
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Elderly Couple Dies By Suicide: कांदिवली पूर्व (Kandivali East) येथील आर्य चाणक्य नगर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सुमारे पाच दिवसांपूर्वी 61 वर्षीय पुरुष आणि त्याच्या 57 वर्षीय पत्नीने आत्महत्या (Suicide) केली. प्रमोद चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर अशी त्यांची नावे आहेत. 17 मे रोजी पोलिसांना मृतदेह सापडला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये नैराश्याने ग्रस्त असल्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आर्थिक अडचणीमुळे हे जोडपे नैराश्यात होते असे समजते. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोणकर हे दुसऱ्या मजल्यावरील अनुभूती सोसायटीत राहत होते, त्यांना मूलबाळ नव्हते. प्रमोद चोणकर हा रिअल इस्टेट एजंट होता. रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याला पाहिले नव्हते. गेल्या गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत समता नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला असता प्रमोद पंख्याला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळले. तर त्याच्या शेजारी पत्नी अर्पिता मृतावस्थेत पडली होती. (हेही वाचा - Kalyani Nagar Pune Accident: पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल)

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्रमोद यांनी गळफास घेतला असला तरी अर्पिताच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तिने कीटकनाशक प्यायले असावे की प्रमोदने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर गळफास घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत. (हेही वाचा-  चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा स्फोट; परिसर हादरला, घरांची पडझड (Watch Video)

प्रथमदर्शनी, तपासात असे दिसून आले की, या जोडप्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. ज्यामुळे, ही दुहेरी शोकांतिका उद्धभवली. समता नगर पोलिसांनी याप्रकरणी दोन स्वतंत्र एडीआर अपघाती मृत्यू अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे.