पुणे मेट्रो वरुन अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांची टीका
Amruta Fadnavis and Kishori Pednekar (Photo Credits-Twitter)

अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरुन राज्य सरकारसह कामाचे श्रेय घेऊन जाणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याचसोबत पुण्यातील कोरोनाच्या नियमांवरुन सुद्धा त्यांनी विधान केले आहे. याच कारणावरुन आता मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिउत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. पुढे पेडणेकर यांनी असे म्हटले की, आम्ही जे काही करतो ते त्यांना कधीच आवडत नाही आणि त्याचे कौतुक सुद्धा करत नाही.

किशोरी पेडणेकर यांनी पुढे असे म्हटले की, कोण आहे अमृता फडणवीस? विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी? राज्यात अमृता फडणवीस या कोणालाच आवडत नाही. त्याचसोबत मुळ मुद्द्यावरुन सुद्धा त्यांनी गुपचिळी धरत त्यांच्या बद्दल बोलणे टाळले. मात्र अवघ्या काही शब्दांमध्येच किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली.(Maharashtra Flood Relief: महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र, कोकणासाठी नितीन गडकरी यांच्याकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर)

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थितीत लावली होती. धागा हँडलूम मोहत्सव पुण्यात आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी मीडिया सोबत राजकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा केली. तसेच महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा त्यांनी टीका करणे सोडले नाही.

अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने 26 जिल्ह्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले आणि दुकाने 8 वाजल्यापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. मात्र पुण्यासह 11 जिल्ह्यांना यामधून वगळण्यात आले. त्यामुळेच पुण्यातील उद्योजकांकडून राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचसोबत राज्यात आलेल्या पुरामुळे पुरग्रस्तांना देऊ केलेल्या आर्थिक मदतीवरुन ही अमृता फडणवीस यांनी टीका केली. त्यांनी असे म्हटले की, राज्य सरकारने पुरग्रस्तांना दिलेल्या मदतनिधीतून काही होणार नाही.