राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबई पोलिसांध्ये तक्रार दिली आहे. ही तक्रार एका डिझायनर विरोधात आहे. ज्या डिझायनरचे नाव अनिक्षा (Designer Aniksha) असे आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनरवर एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न आणि कट रचून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill Police Station) पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी अनिक्षा नामक डिझायनरवर गुन्हा दाखल केला आहे.
मलबार हिल पोलिसांनी अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. अनिक्षा नामक डिझायनर वरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 120, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे समजते.
अमृता फडणवीस यांनी पलिसांडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2021 मध्ये अमृता फडणवीस आणि डिझानयनर अनिक्षा यांच्यात पहिली भेट झाली. या वेळी अनिक्षाने फडणवीस (अमृता) यांना सांगितले की, आपण दागिने आणि कपड्यांची डिझायनर आहोत. आपण बनविलेले कपडे आणि दागिने आपण कार्यक्रमात वापरावे अशी विनंती अनिक्षाने अमृता फडणवीस यांना केली. त्यानंतर सागर बंगला येथे अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्यात अनेकदा भेटी झाल्या. (हेही वाचा, Uorfi Javed Nudity Row: अमृता फडणवीस यांचा उर्फी जावेदला पाठींबा; म्हणाल्या- 'महिला म्हणून तिने जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही')
दरम्यान, पुणे येथील एका कार्यक्रमात 27 जानेवारी 2023 रोजी अनिक्षा अमृता फडणवीस यांना भेटली. कार्यक्रम संपल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवताना तिने म्हटले की, तिचे वडील पोलिसांना बुकींबद्दल माहिती देत होते. ज्यामुळे पोलिसांनी सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसा कमावता येऊ शकतो. तसेच, सट्टेबाजांकडून कारवाईपासून बचावण्यासाठी आपणास पैसैही घेता येऊ शकतात. अनिशाचे बोलणे ऐकून आपण तिला तातडीने कारमधून खाली उतरवल्याचेही फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले म्हटले.
ट्विट
Case registered against a woman designer namely Aniksha and her father after they allegedly tried to bribe Rs. 1 crore and threaten Amruta Fadnavis, wife of Maharashtra Dy CM Devendra Fadnavis. Amruta Fadnavis lodged a complaint at the Malabar Hill Police Station after receiving… https://t.co/udJPEBb0GH
— ANI (@ANI) March 16, 2023
अमृता फडणवीस यांनी पुढे म्हटले की, अनिक्षाने 16 फेब्रुवारी रात्री 9,30 च्या दरम्यान त्यांना फोटन केला. तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणातून बाहेरकाढण्यासाठी आपली एक कोटी रुपये देण्याची तयारी आहे, अशी लाच देण्याचाही तिने प्रयत्न केला. पण, त्यानंर आपण तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर लगेचच 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11.55 ते 12.15 या काळात साधारण 22 व्हिडिओ क्लिप, तीन व्हॉईस नोट अनोळखी क्रमांकावरुन आपल्या व्हॉट्सअॅपवर आले, असल्याचा दावाही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत केला आहे.