शिवसेनेचा 'शवसेना' असा उल्लेख करत अमृता फडणवीसांनी केली टिका, म्हणाल्या आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये, पाहा ट्विट
Amruta Fadnavis | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Election 2020) मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत NDA ने आपली सत्ता कायम राखत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे केंद्रासह राज्यातील भाजपचे नेतेही बिहारच्या विजयी उमेदवारांवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. बिहारमध्ये मिळालेले बहुमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर तेथील जनतेने दाखवलेला विश्वास असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. दरम्यान त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी बिहारच्या निकालावरून शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका अमृता फडणवीस यांनी ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, 'महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्या बाबत धन्यवाद,' असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. हेदेखील वाचा- 'त्या' दिवशी आम्ही राज्यात पर्यायी सरकार देऊ; महाराष्ट्रातील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

अमृता फडणवीसांच्या या टीकेचे शिवसेना काय उत्तर हे येणा-या काही दिवसातच कळेल. पण बिहारमध्ये 50 जागा लढविणा-या शिवसेनेला निवडणुकीत भोपळाही फोडता न आल्याने काही उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारमध्ये NDA ची सत्ता पुन्हा आल्याने सर्व जनतेचे आभार मानत येथील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वासाची लहर अजूनही कायम आहे असेही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.