Amravati Crime: पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात; अमरावती शहरातील पांढुरणा भागातील घटना
Pregnant | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

घरगुती हिंसाचारात (Domestic Violence) गर्भवती महिलेस (Pregnant Lady) धक्काबुक्की करताना पोटावर बॅग मारल्याने तिचा गर्भपात (Abortion) झाल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील (Amravati Crime) पांढुरणा भागात घडली आहे. घडल्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. ही घटना पीडितेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ (Dowry) करताना घडल्याची माहिती आहे. साररच्या कुटुंबीयांकडून पीडितेचा हुंड्यासाठी छळ गेला जात होता. त्यातून झालेल्या मारहाणीवेळी बॅग पोटावर मारली गेल्याने तिचा गर्भपात झाल्याचा पीडितेचा आरोप आहे. पीडितेने पतीसह साररच्या चौघांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे पती आणि साररच्या इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती जिल्ह्यातून महिलांचा छळ केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. कौटुंबीक कलहाच्या कारणातून विवाहितेला डिझेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची घटना नुकतीच पुढे आली होती. ही घटनाही अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे घडली होती. या घटने पीडितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेप्रमाणेच दुसरी घटनाही अमरावतील शहरातील पांढुरणा भागात घडली आहे. त्यामुळे या घटनेमुळेही परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Anal Sex Cause Pregnancy? अ‍ॅनल सेक्स मुळे गरोदर राहण्याचा किती टक्के चान्स आहे जाणुन घ्या)

प्राप्त माहितीनुसार, पांढुरणा भागात घडलेल्या घटनेत सासरकडील मंडळी पीडितेस हुंडासाठी तगादा लावत होते. पीडितेचा विवाह पाच जानेवारी रोजी पांढुरणा येथील एका युवकासोबत पार पडला होता. विवाहानंतर पीडिता सासरी नांदायला आली होती. दरम्यन, पती आणि सारसचे कुटुंबीय विविध वस्तू आणण्यासाठी पीडितेला सातत्याने तगादा लावत होते. त्यासाठी ते तीला वारंवार दबाव टाकत असत. इतकेच नव्हे तर जेव्हा पती घरी नव्हाता तेव्हा दीराने पीडितेचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप पीडितेने केला आहे. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रारही दिली आहे. विवाहापूर्वी पीडिता ही अमरावती शहरातील शेगांव नाका भागात राहात होती.