'माझ्या नवर्याची बायको..' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात खास जागा मिळवली आहे. शनाया-गुरूनाथ आणि राधिका यांच्यामधील जुगलबंदीने रसिकांना खिळवून ठेवण्यात मालिकेला यश मिळाले आहे. सार्याच वयोगटामध्ये या मालिका तुफान लोकप्रिय आहे. मात्र या मालिकेच्या प्रेमापोटी अग्निशामन दलाच्या लोकांमध्ये जुंपल्याची एक घटना समोर आली आहे.
अंबरनाथ अग्निशमन दलामध्ये मालिका आणि क्रिकेटप्रेमीमध्ये जुंपली. किशोर भोर यांना भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना पहायचा होता तर प्रकाश कराड या त्यांच्या सहकार्याला 'माझ्या नवर्याची बायको' ही मालिका पहायची होती. हळूहळू शाब्दिक चकमक हाणामारीमध्ये रूपांतरीत झाली. रागाच्या भरात किशोरने लोखंडी रॉड मारल्याने त्यांचा सहकारी जखमी झाला. या प्रकरणाबाबत अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कर्मचार्याच्या गैरवर्तनामुळे दोन्ही कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
टीआरपीमध्ये 'माझ्या नवर्याची बायको'.. मालिका अव्वल स्थानी आहे. काही दिवसांपूर्वी मालिका 'शनाया' साकरणार्या रसिका सुनीलने मालिका सोडली. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी रसिका गेली. त्यानंतर आता ईशा केसकर 'शनाया'च्या भूमिकेत आहे.