अंबरनाथ (Ambarnath) येथील एका विद्यार्थ्याच्या शब्दांचा स्पेलिंग चुकल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने त्याला स्टीलच्या पट्टीने मारहणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पाठीवर आणि हातावर लाल-काळे वळ उठले आहेत.
पीडित मुलगा क्लासवरुन घरी आल्यावर त्याला आईने कपडे बदलण्या सांगितले.त्यावेळी मुलाच्या आईला त्याच्या अंगावर लाल-काळे मारल्याचे डाग दिसून आले. तेव्हा मुलाने शाळेत घडलेला प्रकार आईला सांगितला असता तातडीने घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेतली.(हेही वाचा-आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर रोम मध्ये अॅसिड हल्ला)
या प्रकरणी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. तसेच जखमी झालेल्या मुलावर तेथील नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.