Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Ambarnath: अंबरनाथ मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून तीन जणांना रंगकामासाठी बोलावले होते. मात्र त्यांना तिघांना टाकीसफाईचे काम दिल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर रंगकामासाठी बोलावून टाकी साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Thane: आईसह 3 मुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, वडीलांचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न)

केमिकलच्या भुमिगत टाक्या साफ करण्यास त्या तिघांना सांगितले. परंतु त्यांना रंगकामासाठी बोलावल्याची आधी सुचना दिली गेली होती. तिघे घटनास्थळी आले असता त्यांना केमिकलच्या टाक्या साफ करायला दिल्या आणि त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी घेण्यात आली नव्हती.सकाळीच्या सुमारास तिघे कामगार टाकी साफ करण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी एकाची तब्येत बिघडल्याने त्यांना औषध आणण्यासाठी एक व्यक्ती गेला. परंतु त्याचवेळी टाकीत श्वास गुदमरुन ते बेशुद्ध झाल्याचे कळले असता त्यांचा मृत्यू झाला. कामासाठी आलेले कामगार हे उत्तर प्रदेशातील राहणारे होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणा मुळे तिघांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप लावण्यात येत आहे.(मुंबई: मीरा रोड परिसरात रेस्टॉरंटच्या पाण्याच्या टाकीत 2 कामगारांचे मृतदेह)

याआधी भिवंडी  येथील समरुबाग परिसरातील इमारतीच्या पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून तो नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. अखेर त्याचा इमारतीच्या बेसमेंटला असलेल्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.