Thane: आईसह 3 मुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, वडीलांचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
21 ऑक्टोबरपासून हे चौघेही बेपत्ता होते. ते हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. अखेर या चौघाचेही मृतदेह आढळून आले आहेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची दुर्गंधी येत होती. झाडाला आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये रंजना (वय 30) ,मुलगी दर्शना (वय 12), रोहिणी (वय 6) आणि मुलगा रोहित (वय 6) यांचा समावेश आहे.
तीन मुले आणि आई अशा चार जणांचा मृतदेह झाडाला लटकत्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना ठाणे (Thane District) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi Taluka) तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर (Ubarkhand Pachhapur Forest) जगंलात घडली आहे. मृतांमध्ये दोन मुली आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पत्नी आणि मुलांचा मृतदेह पाहून श्रीपत बच्चू बांगरी यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, 21 ऑक्टोबरपासून हे चौघेही बेपत्ता होते. ते हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. अखेर या चौघाचेही मृतदेह आढळून आले आहेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची दुर्गंधी येत होती. झाडाला आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये रंजना (वय 30) ,मुलगी दर्शना (वय 12), रोहिणी (वय 6) आणि मुलगा रोहित (वय 6) यांचा समावेश आहे.
माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या चौघांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत या चौघांचाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच माहिती मिळणार आहे. (हेही वाचा, Pune Suicide: पुणे येथे 13 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का)
दरम्यान, पत्नी आणि मुलांचे मृतदेह पाहून श्रीपत बच्चू बांगरी यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे श्रीपत बंगारी यांच्या दुसऱ्या पत्नीनेही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पुढील उपचारांसाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2020 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

