Shree Siddhivinayak Ganapati Temple | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात मागील 8-9 महिन्यांपासून बंद असलेली सारी धार्मिक आणि प्रार्थना स्थळं (Religious Places)उघडण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. दिवाळी पाडवा (Diwali Padwa) म्हणजे 16 नोव्हेंबरपासून आता भाविकांना थेट मंदिरं (Temple) किंवा त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन देवदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही घोषणा करताना प्रत्येक भाविकाला मास्क घालणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोविड 19 संबंधित इतर नियमावलींचंदेखील पालन करावं लागणार आहे. शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Mumabi Local ने प्रवास करण्याची परवानगी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

सध्या भारतामध्ये दिवाळीचा सण सुरू झाला आहे. हा केवळ हिंदू धर्मियांचा सण नाही. तर जैन आणी शीख धर्मिय देखील दिवाळीच्या निमित्ताने पूजा-अर्चना करतात. आता राज्य सरकारने सारी प्रार्थना स्थळ खुली केल्याने मंदिरं पुन्हा गजबजायला लगणार आहेत. सोमवारी 16 नोव्हेंबर म्हणजे दिवाळी पाडवा आहे. हा हिंदू धर्मियांसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे.

ANI Tweet

दरम्यान महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गत जसा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने झाला तसा अनलॉकदेखील हळूहळू होत आहे. कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन आता नागरिकांना कडक नियमांमधून शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान मंदिरं खुली व्हावीत यासाठी महाराष्ट्रात भाजपाने आक्रमक आंदोलनं केली होती. त्यासोबतच मनसे, वंचित, एमआयएम पक्षानेही वारंवार सरकारकडे प्रार्थना स्थळं खुली करण्यासाठी मागणी केली होती.