लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात अटीतटीची लढत पहायला मिळाली होती.पवार कुटुंबियातच हा सामना रंगला होता. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेला हा सामना देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या पराभवाची खंत दादांनी अखेर व्यक्त केली. बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही . कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला एकमुखी विरोध केला. (हेही वाचा - NCP New Song Launch: 'दादांचा वादा'; अजित पवारांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणं प्रदर्शित )
बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मिसरूड आमदार मिळाला पाहिजे. 1991 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. करोडो रुपयाच्या. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे बघा. काही राहिले. मान्य करतो. कसे करायचे ते बघू. न मागता मेडिकल कॉलेज मिळतं. अहिल्यादेवीचं नाव मेडिकल कॉलेजला देणार आहोत. आयुर्वेदिक कॉलेज तयार करतो. असे यावेळी अजित पवारांनी यावेळी म्हटले आहे.
इतकी विकासाची कामे करूनही बारामतीत हरलो. कामं करूनही पराभव झाला, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का. आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अर्थसंकल्पात मी लिहिलं आहे. बारामतीत माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का? असा प्रश्न त्यांनी बारामतीकरांना विचारला. त्यांच्या या प्रश्नामुळे बारामतीत पवार काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.