राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर करण्यात आलेली ई़डीची (ED) कारवाई ही विरोधी पक्षाची चाल होती, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला होता. यानंतर अजीत पवार (Ajit Pawar) यांनी खाजगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याही अटकेचा मुद्दा उपस्थित करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचे अश्रू खरे असतील तर, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेबद्दल माफी मागावी असे संजय राऊत ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.
नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेही बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेची आठवण करुन दिली होती. यानंतर एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात अजित पवार म्हणाले "बाळासाहेबांना करण्यात आलेल्या अटकेदरम्यान आम्ही इतक्या टोकाचे राजकारण न करण्याची विनंती केली होती. परंतु, आमच्या मताला तेव्हा किंमत नव्हती". बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. अजित पवार यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टिका केली आहे. हे देखील वाचा- 'महाराष्ट्रात चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न कराल, तर बांबू बसल्याशिवाय राहणार नाही'- राज ठाकरे
संजय राऊत यांचे ट्विट-
बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता.
बाळासाहेबांना अटक ही चुक होती..वगैरे वगैरे.हे कळायला इतकी वर्ष लागली
अजीत दादा तुमचे अश्रू खरे असतील तर त्या अटके बद्दल माफी मागा.
जय महाराष्ट्र
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 12, 2019
दरम्यान संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चुक होती हे कळायला इतकी वर्ष का लागली? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच अजित पवार यांचे अश्रू खरे असतील तर, त्यांनी त्या अटकेबद्दल माफी मागावी", अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.