Mumbai Pune Direct Flight: एअर इंडिया ची मुंबई पुणे थेट विमानसेवा 26 मार्चपासून होणार सुरू
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

मुंबई पुणे थेट विमानसेवा (Mumbai Pune Direct Flight Service) सुरू करण्याची मागणी आता अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. Air India कडून ही विमानसेवा 26 मार्च पासून सुरू होत आहे. एका आठवड्यात सहा वेळेस ही विमान झेपावणार आहेत. एअर इंडियापूर्वी जेट एअरवेज कडून मुंबई-पुणे थेट विमानसेवा सुरू केली होती पण 2019 मध्ये ही सेवा बंद झाली. मुंबई-पुणे रस्ते मार्गे किंवा काही ट्रेन्स मुळे 3-4 तासांचा प्रवास होतो पण आता मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी विमानसेवेमुळे तासाभरावर येऊन ठेपला आहे. नक्की वाचा: पुण्यात हिंजवडी ते विमानतळ 'एअरपोर्ट एसी बस सेवा' होणार बंद, पुणे महानगर परिवहन महामंडळाचा महत्त्वपुर्ण निर्णय .

मुंबई-पुणे विमानसेवा वेळ आणि तिकीटदर

मुंबई कडून पुण्याकडे विमान सकाळी 9.45 ला झेपावेल आणि पुण्यात 10.45 ला लॅन्ड होणार आहे. तर परतीचं विमान म्हणजे पुणे-मुंबई विमान सकाळी 11.20 आहे. मुंबई मध्ये हे विमान 12.20 ला लॅन्ड होणार आहे. दरम्यान या विमानसेवेसाठी इकॉनॉमी क्लास करिता प्रवाशांना 2,237 रुपये आणि बिझनेस क्लाससाठी 18,467 रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवार वगळता आठवडाभर ही विमानसेवा सुरू राहणार आहे.

मुंबई पुणे विमान प्रवासासाठी एअर इंडिया त्यांच्या ताफ्यातील सर्वात लहान विमान एअरबस ए 319 तैनात करणार आहे. देशांतर्गत विमानसेवेसोबतच पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवांना देखील चालना दिली जाणार आहे. पुण्यातून थेट जर्मनी, अमेरिका, इंग्लंड साठीही विमानसेवा सुरू होत आहे.