MP Imtizay Jalil Invites Raj Thackeray: इम्तियाज जलील यांच्याकडून राज ठाकरे यांना 'इफ्तार पार्टी'चे निमंत्रण
Imtiaz Jaleel, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उद्या (1 मे) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. अलिकडे त्यांनी घेतलेल्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरुन रोजदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, एमआयएम (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच इम्तियाज जलील यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीला राज ठाकरे उपस्थितीर दर्शवणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा जाहीर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. कधी या सभेला परवानगी मिळण्यावरुन तर कधी सभेला असलेल्या अटी आणि शर्थींमुळे. शेवटी जोरदार चर्चा रंगल्यानंतर हो..ना.. करत सभेला परवानगी मिळाली. आता या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादचे राजकीय, सामाजिक वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे. ( हेही वाचा Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या महाआरतीला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा पाठिंबा, अयोध्या दौऱ्यातही होणार सहभागी)

दुसऱ्या बाजूला खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यासोबतच औरंगाबादचे खासदार निखील गुप्ता यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता कायम राहावी यासाठी आमच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे काय? हे विचारण्याकरता आणि तशी काही मदत हवी असेल तर सांगा म्हणून आपण त्याच्याकडे गेलो होतो, असे जलील म्हणाले.

ट्विट

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, माझा विश्वास आहे की अशा 1% लोकांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस सक्षम आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे/समाजाचे असोत." जो सियासत करने के लिए आये हैं वो सियासत करे और जो इबादत करना चाह रहे हैं उन्हे इबादत करने दो. राज ठाकरे यांना मी इतकेच सांगेन हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. आपण एकत्र येऊन इफ्तार करु. ज्यामुळे चांगला संदेश जाईल. इतकेच मी राज ठाकरे यांना सांगेन असेही जलील म्हणाले.