अहमदनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरुन रॅपलिंग करताना मृत्यू
प्रसिद्ध ट्रेकर अरुण सावंत (Photo Credits-Facebook)

हरिश्चंद्र गडावरुन रॅपलिंग करत असताना शनिवारी प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (Arun Sawant) अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर सावंत यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला असून रॅपलिंग करताना खाली कोळसल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सावंत यांच्यासोबत असलेल्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

कोकण कड्याच्या येथे रॅपलिंग करण्यासाठी अरुण सावंत हे टीम लीड करत होते. मात्र शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास ते अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा स्थानिकांकडून तातडीने शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. रॅपलिंग करतानाचा अर्धा टप्पा पूर्ण झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले 29 जण खाली उतरुन आले. मात्र सावंत हे शेवटी दोरीच्या सहाय्याने रॅपलिंग करत खाली येत असताना अचानक बेपत्ता झाले.(नाशिक: मनमाडमधील चांदवड येथे दुचाकी आणि ट्रेलरचा भीषण अपघात; आई-वडिलांसह 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू)

तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, अरुण सावंत नामक या उत्तुंग शिखराने एक साहसी पिढी घडवली आहे.

हरिशचंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा गावातून अरुण सावंत यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर आज सकाळी त्यांचा मृतदेह भवानी धारेच्या येथे मिळून आला. सावंत यांचा मृतदेह गोरेगाव येथील राहत्या घरी नेण्यात आल्यानंतर अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहेच