Accident (PC - File Photo)

Ahmednagar-Sambhaji ExpressWay Accident: अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जानेवारी (28 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.  भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतक्या जोरात होती की, चौघांचा जागीच मृत्यू झाला. अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल परिसरात घडली.( हेही वाचा- पुणे-सातारा महामार्गावर भरधाव ट्रकची 4 वाहनांना धडक, 5 जण जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलीचा समावेश आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय वर्ष २८), सोनाली अनिल पवार वय (२२), माऊली अनिल पवार अशी मृतांची नावे आहे. सोबत त्यांची सहा महिन्यांची चिमुकली देखील जागीच मरण पावली. अपघात झाल्यानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवर असलेले भगवान आव्हाड हे जखमी झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी केलेल्या तपासणी आले की, पवार कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून अपघाताची नोंद घेतली. कंटनेर चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. रस्त्यावर अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानतंर पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. पवार कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच, गावात शोककला पसरली.