Pune-Satara Accident: पुणे-सातारा महामार्गावर भरधाव ट्रकची 4 वाहनांना धडक, 5 जण जखमी
Accident (PC - File Photo)

पुण्यातील (Pune News) ससेवाडी गावाच्या हद्दीत पुणे - सातारा महामार्गावर (Pune-Satara Road) एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या (Pune-Satara Accident) दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे ससेवाडी गावाजवळील उड्डाणपुलावर ट्रकवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर भरधाव ट्रकची एसटी बस, पिक अप, टेम्पोसह कारला धडक बसली. ( Pune Accident: डुलकी लागताच समोरच्या वाहनाला धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, पुण्यातील घटना)

या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी एक जण गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गावर काही काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी बाजूला करून वाहतुक कोंडी सोडवली.

दरम्यान पुण्यात काही दिवसापुर्वी एक अपघात झाला होता.  या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना घडला