अहमदनगर महापालिका निवडणुक, मतदारांचा जोरदार प्रतिसाद | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Ahmednagar Municipal Corporation Election 2018: अहमदनगर (Ahmednagar ) महानगरपालिका ( Municipal Corporation ) निवडणुकीसाठी (For Election)  कर्तव्यावर असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याच मृत्यू झाला आहे. सावेडी प्रभागातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. या कर्मचाऱ्याची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे कर्तव्यावर असतानाही तो विश्रांतीसाठी झोपला होता. दरम्यान, झोपेतच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या जवानाचे नाव अद्याप समजू शकले नाही. मात्र, हा कर्मचारी गृहरक्षक दलाचा जवान असून निवडणूक बंदोबस्तासाठी गृहरक्षक पथकासोबत तो अहमदनगर येथे आला होता.

प्राप्त माहितीनुसार, गृहरक्षक पथकासोबत हा कर्मचारी पोलीस मुख्यालयात शनिवारी दाखल झाला होता. रात्री जेवण करुन तो झोपला होता. दरम्यान, सकाळी सोबतचे सर्व कर्मचारी झोपेतून उठले. हा कर्मचारी झोपलेलाच होता. त्यामुळे इतर सहकाऱ्यांनी त्याला झोपेतून उठवायचा प्रयत्न केला. या वेळी तो बेशुद्ध असल्याचे इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा, महानगरपालिका निवडणूक 2018: अहमदनगर, धुळ्यात मतदानाला सुरुवात )

दरम्यान, मृत कर्मचाऱ्यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.