महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट; दुसर्‍या उमेदवार यादीत 20 जणांची नावं
File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) च्या रणधुमाळीला आता सुरूवात झाली आहे. येत्या 4ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने आता सारेच पक्षांची उमेदावार जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आज ( 3 ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या 20 जणांच्या दुसर्‍या यादीमध्ये माळशिरस मधून उत्तमराव जानकर, पंकज भुजबळ यांचं या यादीमध्ये नाव आहे. Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जुन्या नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विजयसिंह मोहिते पाटील यांनी अलविदा म्हटल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी भाजपाच्या जवळ असणारे धनगर समाजाचे उत्तमराव जानकर यांना तिकीट दिले. आता ही कडवी टक्कर कोण जिंकतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यासोबतच आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पंकज भुजबळ यांना नांदगाव मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी 

जळगाव शहर - अभिषेक पाटील

बाळापूर - संग्राम गुलाबराव गावडे

कारंजा - प्रकाश डहाके

मेळघाट - केवळराम काळे

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

दिग्रस - मो. तारीक मो. शमी

गंगाखेड - मधूसुदन केंद्रे

कन्नड - संतोष कोल्हे

नांदगाव - पंकज भुजबळ

बागलाण - दीपिका चव्हाण

देवळाली - सरोज अहिरे

कर्जत - सुरेश लाड

खेड आळंदी - दिलीप मोहिते

मावळ - सुनील शेळके

पिंपरी - सुलक्षणा शिलावंत

आष्टी - बाळासाहेब आजबे

म्हाडा - बबनदादा शिंदे

मोहोळ - यशवंत माने

माळशिरस - उत्तमराव जानकर

चंदगड - राजेश पाटील

21 ऑक्टोबर 2019 दिवशी महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर निवडणूक होणार आहे. त्याचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर होइल. या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष प्रत्येकी 125 जागा लढणार आहे.