Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जुन्या नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी
Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ ANI)

NCP Candidates First List: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2019) अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, आज रात्री भाजप (BJP) उमेदवारांची दुसरी यादी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या पहिल्या यादीद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षातील अनेक दिग्गजांना संधी दिली आहे. या यादीमध्ये एकूण 77 उमेदवारांच्या नावाचा उल्लेख आहे. यामध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संदीप क्षीरसागर, आदिती तटकरे, छगन भुजबळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी -

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सामोपचाराने चर्चा करून महाआघाडीची घोषणा केली. आज याबाबत एका पत्रकार परिषदही पार पडली होती, यामध्ये दोन्ही पक्ष प्रत्येकी 130 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता एनसीपीची पहिली यादी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादीने येवला येथून छगन भुजबळ, इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना तिकिट दिले आहे. तर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना बारामती व नातू रोहती पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा : Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी)

या महाआघाडीमध्ये मित्र पक्षांना 38 जागा देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी 10 जागा, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला 2 जागा, व ऐनवेळी आपल्या गोटात सामील करून घेतलेल्या समाजवादी पार्टीला 3 जागा देण्यात येतील. यावेळी राष्ट्रवादीने जुन्या बऱ्याच आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, तर काही महत्वाच्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश आहे. दुसरीकडे भाजपच्या दुसऱ्या यादीतही काही महत्वाच्या नेत्यांच्या नावाचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.