मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज' वर आज मनसेची मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी निवडणूका आणि मनसेला मजबूत करण्यासाठी लोकसभा मतदार संघ निहाय 1 नेता 1 सरचीटणीस अशी समिती बनवण्यात आली आहे. दरम्यान या समिती मध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची देखील वर्णी लागली आहे. अमित ठाक्रे यांच्यावर उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाची धुरा देण्यात आली आहे तर सरचिटणीस म्हणून त्यांच्या सोबतीला संदीप देशपांडे काम करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच डोंबिवली मध्ये मनसेला दोन जणांनी रामराम ठोकल्यानंतर मनसेकडून तातडीने 24 तासांत मनोज घरत यांची आता डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यापाठोपाठ आज मनसेने मुंबई शहरासाठी 1 नेता 1 सरचिटणीस अशी समिती बनवली आहे. Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार.
कशी असेल मनसेची एक नेता एक सरचिटणीस समिती?
१) उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे
२) उत्तर मध्य मुंबई
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे
३) उत्तर पश्चिम मुंबई
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे
४) दक्षिण मध्य मुंबई
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे
५) दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे
६) उत्तर पूर्व मुंबई
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे
मनसेची ही समिती नेमून दिलेल्या भागात पक्षाची स्थिती आणि मतदार संघातील गोष्टी यांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल राज ठाकरेंकडे सादर करणार आहेत. लवकर मुंबई पाठोपाठ आता ठाणे, पुणे, नाशिक मध्येही समितीचं गठन केले जाणार आहे.
दरम्यान बाळ नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मनसेच्या बैठकीत या समिती निर्मितीचे संकेत दिले होते. त्यावेळेसही अमित ठाकरे, त्यांची पत्नी मिताली ठाकरे उपस्थित होते. सध्या पुणे, नवी मुंबई मध्ये देखील शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे शाखांचे उद्घाटन करताना दिसत आहेत.