Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्‍यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार

मनसे अध्यक्ष 1 ते 9 मार्च दरम्यान अयोद्धेचा दौरा करणार असल्याचंदेखील सांगितलं आहे. 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदा पक्षाच्या वर्धापनदिनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे.

Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्‍यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: ANI)

कोविड 19 नंतर हळूहळू सामन्य होत असलेली स्थिती पाहता आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा जोश भरण्यासाठी मेगा प्लॅन बनवला आहे. आज मुंबई येथे एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसेच्या बैठकीनंतर नेते बाळा नांदगावकर (Bala Nanadgaokar)  यांनी मनसेचा मेगा प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  1 ते 9 मार्च दरम्यान एक दिवस अयोद्धेचा दौरा (Ayodhya) करणार असल्याचंदेखील सांगितलं आहे. 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदा पक्षाच्या वर्धापनदिनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे. (नक्की वाचा: Raj Thackeray यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाचं वॉरंट जारी; 6 फेब्रुवारीला कोर्टात व्हावं लागणार हजर)

मनसे कडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • 27 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस हा दिवस मनसे यंदा मोठ्या धमाधुमीमध्ये साजरा करणार आहे.
  • मराठी राजभाषा दिवस याच औचित्य साधत मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राज ठाकरेंसह अनेक मनसे नेते मराठीत स्वाक्षरी करणार आहेत.
  • या दिवसाचं औचित्य साधत मराठी खेळाडू, पत्रकार, कलाकार यांचा गौरव देखील केला जाणार आहे.
  • मनसे 9 मार्च हा पक्षाचा वर्धापन दिन आणि राज्यातील प्रमुख महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल दरम्यान सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहेत.
  • महाराष्ट्र सैनिक म्हणून मनसैनिकांना आता ओळखपत्र दिलं जाईल. गटाध्यक्षांचं नाव राजदूत होईल. त्यांना स्वतंत्र बिल्ला असेल.

दरम्यान आजच्या मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांची सून मिताली बोरूडे ची देखील पहिल्यांदाच उपस्थिती पाहून अनेकांचे तिने लक्ष वेधले होते. अमित ठाकरे यांना पक्षात नेते पद दिल्यानंतर वर्षाचा काळ लोटल्यानंतर आता त्यांच्यावर कोणती मोठी दिली जाणार का? अशा शक्यतांबद्दलही चर्चा व्हायला लागली होती.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार मनसेची सर्व महापालिका स्तरावर एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2021 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).