मुंबई मध्ये यंदा मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठ कमी असल्याने मुंबई महानगर पालिकेने 5 ऑगस्ट पासुन पाणी कपात करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान मागील 2 दोन दिवसांपासून मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 2015 नंतर इतका मोठा पाऊस मागील काही दिवसांत नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या पावसामुळे मुंबईवरील पाणीसंकट टळेल की नाही? याचं उत्तर अद्याप देण्यात आलेले नाही. मात्र मागील 3 दिवसांत मुंबईमध्ये तलावक्षेत्रात कसा आणि किती पाऊस पडला आहे याची आकडेवारी आता समोर आली आहे.
मुंबई हवामान वेधशाळा उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सातही तलावांमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी आता जाहीर केली आहे. दरम्यान मुंबईला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा ही तलावं पाणीपुरवठा करते.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये मागील 3 दिवसांत झालेला पाऊस
Lakes Rainfall in last 3 days in Maharashtra.
Excuse for poor handwriting. pic.twitter.com/LVhJ4QuHDa
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 6, 2020
काल वैतरणा, विहार, तुलसी या तलावक्षेत्रांमध्ये चांगला पाऊस पडला आहे. 27 जुलै दिवशी तुळशी तलाव पूर्णपणे भरला होता. त्यानंतर काल रात्री विहार तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागला आहे. दरम्यान विहार आणि तुळशी हे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सर्वात लहान दोन तलावांपैकी आहेत.
दरम्यान काहींना कालचा जोरदार वार्या सह कोसळणारा पाऊस हा सायक्लोन होते का? असा प्रश्न पडला होता. मात्र त्याबद्दलही माहिती देताना के एस होसाळीकर यांनी हा मान्सून मधील एक स्थिती होती ते चक्रीवादळ नव्हतं असे स्पष्ट केले आहे.