वकील सुनील अग्रवाल यांची वृद्ध आईसोबत आत्महत्या; कृष्णा नदी पात्र, रेल्वे रुळावर सापडले मृतदेह
(Archived, edited, symbolic images)

सुनील अग्रवाल (Sunil Agarwal) या 47 वर्षीय विकीलाने आपल्या 70 वर्षीय वृद्ध आईसोबत आत्महत्या केल्याची घटना सांगली शहरात घडली आहे. पुष्पा अग्रवाल (Pushpa Agarwal) असे वकील सुनील अग्रवाल यांच्या आईचे नाव आहे. पुष्पा यांचा मृतदेह कृष्णा नदी ( Krushna River) पात्रात तर, सुनील याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळाला. दोघेही मिरज (Miraj) येथील ब्राम्हणपुरी येथील राहणारे आहेत. ३० एप्रिल पासून दोघेही बेपत्ता होते.

प्राप्त माहितीनुसार, मिरज येथील कृष्णा घाट स्मशानभुमी येथे एक दुचाकी बेवारस अवस्थेत उभी होती. या दुचाकीवर वकील चिन्ह होते. तर, दुचाकीच्या बाजूला एका महिलेची चप्पल पडली होती. घटनास्थळावरील एकूण स्थिती पाहता महिलेने आत्महत्या केली असावी असा संशय होता. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. मिळालेल्या माहितीवरुन गांधी चौकी पोलीसांना घटनास्थळाला भेट देत तपास सुरु केला. दरम्यान, कृष्णा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. हा मृतदेह बाहेर काढला असता तो पुष्पा अग्रवाल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. (हेही वाचा, CSMT रेल्वे स्थानकात बफरच्या धडकेतील लोकलच्या मोटरमनचा मृत्यू)

दरम्यान, कृष्णा घाट रोड येथे असलेल्या रेल्वे रुळावर आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची पाहाणी केली असता तो सुनील अग्रवाल या वकील व्यक्तीचा असल्याचे समजले. प्रकरणाचा एकूण तपास करता दोन्ही मृतदेह हे मायलेकरांचे असल्याचे समजले. दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. मात्र दोघांनीही हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.