Advay Hiray-Patil Case: अद्वय हिरे यांचा जामीन कोर्टाने फेटाळला; मुक्काम कोठडीतच
Advay Hire | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

नाशिकच्या (Nashik) रेणूका सूत गिरणी कर्ज फसवणूकी प्रकरणी मालेगाव न्यायालयाने अद्वय हिरे (Advay Hiray-Patil) यांना जामीन फेटाळला आहे. अद्वय हिरे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत. हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. सध्या त्यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

कोर्टात युक्तिवादामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, अद्वय हिरे यांनी 7 कोटी 40 लाखांचे कर्ज घेतले ते आता 32 कोटीपर्यंत गेले आहे. यामध्ये एकही हप्ता त्यांनी भरलेला नाही. पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता अन्य ठिकाणी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आता त्यांचा मुक्काम कोठडीत होणार आहे. भाजप नेते Advay Hire यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश, जाणून घ्या कारण .

साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून त्यांनी कर्ज घेतले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक केली. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना शिवसेना अद्वय हिरे यांच्या पाठीशी उभी असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा भाजपा मधून ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला आहे.