आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांची स्थानिक पत्रकाराला मारहाण (PC -Twitter)

Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी एका पत्रकाराला भररस्त्यात बेदम मारहाण केली. संदीप महाजन (Sandeep Mahajan) असं या पत्रकाराचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोनजण पत्रकाराला त्याच्या स्कूटरवरून खाली खेचून जमिनीवर ओढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आरोपींनी पत्रकाराला लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण केली. मारहाणीनंतर पत्रकार हालचाल देखील करू शकत नव्हता. पत्रकाराला रस्त्याच्या मधोमध सोडून कार्यकर्ते घटनास्थळावरून निघून गेले. (हेही वाचा - Pune Teacher Suicide: विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याच्या विरहात शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा)

वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की पत्रकाराने 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणाबाबत आवाज उठवला होता आणि या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी करत आमदार किशोर पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता.

तथापी, यानंतर आमदार किशोर पाटील यांनी या पत्रकाराला फोनवर शिवीगाळ केली होती. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर किशोर पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की, होय, मी पत्रकाराला शिव्या दिल्या. याचा मला अभिमान आहे. समोर आलेली ऑडिओ क्लिप माझीच आहे. मी मान्य करतो. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असंही पाटील यांनी ठामपणे सांगितलं होतं.