
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शालेय परीक्षा सुरु आहेत. दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये (Schools Comes Under BMC Area) शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बोलावल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने शिक्षण विभागाला दिले आहेत. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना थेट बोर्डाच्या परीक्षांसाठीच शाळांमध्ये बोलावण्याचे महापालिकेने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा अद्याप बंदच आहे. मात्र काही इतर बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावत असल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण विभागाला प्राप्त होत आहेत.
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा बंद ठेवण्याच्या सूचना असताना विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे एकप्रकारे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बोलावल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने शिक्षण विभागाला दिले आहेत.
या कारणास्तव जोपर्यंत महापालीकेकडून अधिकृत निर्देश येत नाहीत तोपर्यंत दहावी बारावी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये अशा सूचना पलिक शिक्षण विभागाकडून पुन्हा 15 मार्च रोजी जारी करण्यात आल्या आहेत. राज्य बोर्डाच्या तसेच इतर बोर्डाच्या नियोजित आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विविध करणांसाठी शाळांमध्ये बोलावत असल्याचे निदर्शनास येईल अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई होईल असे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.