मुंबई (Mumbai), पुणे (Pune) या प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येते आहे की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. एकट्या मुंबई शहरात गेल्या 24 तासांत 1 हजार 922 कोरोना रुग्ण आढळले. तर मुंबई नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या दिवसभरात 1 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, मुंबई यांच्यासह राज्यातील विविध जिल्हे असा सर्वांचा मिळून राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,30,547 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती आहे.
मुंबईत चिंता वाढवणारी स्थिती
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या चोवीस तासात 1,922 कोरोना रुग्ण नोंदवले गेले. तर उपचार घेऊन बरे झालेल्या आणि घरी परतलेल्यांची (डिस्चार्ज) संख्या 1,236 इतकी आहे.मुंबईत आज कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. या चौघांनाही दीर्घकाली आजार होते असे सांगितले जात आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. आज घडीला मुंबईत 15,263 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
१६ मार्च, सायंकाळी ६:०० वाजता
२४ तासात बरे झालेले रुग्ण- १,२३६
आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- ३,१९,८७८
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९२%
एकूण सक्रिय रुग्ण- १५,२६३
दुप्पटीचा दर- १५६ दिवस
कोविड वाढीचा दर (९ मार्च-१५ मार्च)- ०.४५%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 16, 2021
पुणेही चिंतेने ग्रासले
मुंबई पाठोपाठ पुणे शहरातही कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 3,574 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 1,577 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 12 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्याच सध्या 24,204 कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 4,10,347 जणांना डिस्चार्ज मिलाले आहेत. तर 9,440 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pune reports 3,574 fresh COVID-19 cases, 1,577 recoveries, and 12 deaths in the last 24 hours
Active cases: 24,204
Total recoveries: 4,10,347
Death toll: 9,440 pic.twitter.com/4WcyVO8D42
— ANI (@ANI) March 16, 2021
राज्यात कोरना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,464 इतकी आहे. त्यापैकी 1,30,547 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 21,44,743 जण उपाचर घेऊन बरे झाले आहेत. तर 52,909 जणांचा मृत्यू झाला आहे.