Rainfall | Image used for Representational purpose only | (Photo Credits: PTI)

मे महिन्यातील कडक उन्हाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी... राज्यात काही ठिकाणी पुढील 2 दोन दिवसात पूर्व मोसमी वादळी वा-याची शक्यता हवामान खात्याने (Weather Report) वर्तविली आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने वादळी पावसाची ही बातमी नागरिकांना सुखावणारी आहे. राज्यात आज आणि उद्या म्हणजेच 3 आणि 4 जून रोजी काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आज सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे कदाचित मुंबईतही(Mumbai)  पावसाच्या हलक्या सरी बरसणार अशी शक्यता नाकारता येत नाही. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, सह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील अन्य भागातही वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र उन्हाचा तडाखा सहन करत असताना नागपूर मध्ये मागील 10 वर्षातील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरातील तापमान 47.5 डिग्री सेलियल्स आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षातील हे दुसरे उच्चांकी तापमान असून 65 वर्षातील हे पाचवे उच्चांकी तापमान आहे.

चंद्रपूर मध्ये 47.8° तापमान तर नागपूर शहरात मागील 10 वर्षातील दुसरे उच्चांकी तापमान; विदर्भात उष्णतेची लाट

नागपूरमध्ये 1954 साली 47.8, 2003 मध्ये 47.7 तर 2005 मध्ये 47.6 डिग्री सेलियल्सची नोंद झाली होती. तर 2009 मध्ये 49 डिग्री सेलियल्स तापमानासह नागपूरात सर्वाधिक उच्चांक तापमान होते.