Abdul Sattar On Shiv Sena: काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; अब्दुल सत्तार यांचा दावा
Abdul Sattar (Photo Credit - Facebook)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) बंडखोर गटात गेलेल्या आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातील ताकद आणखी वाढणार आहे. कारण, केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसह (NCP) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातील आणखीही काही आमदार शिंदे गटात येणार आहेत. जवळपास आणखी 15 ते 20 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आगामी काळात येतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

डॉ. श्रीकांत शिंदे हे एक नवजवान आणि शिंदे गटाचा चेहरा आहे. दिल्लीमध्ये खासदारांमध्ये त्यांचे चांगले वलय आहे. सर्वांशी त्यांचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेतील 18 पैकी 12 खासदारांनी एकत्र येत त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला. दोन तृतियांश खासदारांची अट कायदेशिररित्या पूर्ण होताच त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पत्राचा कायदेशिर विचार करुन लोकसभा अध्यक्षांनी गटाला मान्यताही दिली. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीत इतर पक्षांचे महाराषट्रातील खासदारही श्रीकांत शिंदे यांना भेटतील आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात येतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले. (हेही वाचा, CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, करणार 'या' मोठ्या घोषणा)

ट्विट

एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. शिवसेनेतही त्यांना मानणारा मोठा गट आहे हे आता आमदार आणि खासदारांच्या पाठिंब्यावरुन पुढे आले. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रुमख आणि मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना ते फारसे सूट झाले नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने कारभार करण्याच जरुर प्रयत्न केला. परंतू, आता लोकांची मानसिकताही बदलली आहे. लोकांना त्यांच्यात बसनाउठणारा नेता हवा असतो. ऑनलाईन माध्यमातून हे शक्य होत नसते. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिखे यांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. माझ्यासारखा मुस्लिम आमदारही त्यांच्यावर विश्वास ठेवतो ही किती मोठी गोष्ट आहे.यातच सगळे आले, असेही सत्तार म्हणाले.