CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

राज्यात नवं सरकार स्थापन होवून जवळपास महिना होत आला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्यापासून त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विदर्भ (Vidarbh) दौरा केला होता. तसेच दरम्यान दिल्ली (Delhi) वाऱ्या आणि आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्तानं पंढरपूर (Pandharpur) जिल्ह्याला भेट देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली होती. पण आजपासून मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबईहून (Mumbai) नाशिकमार्गे (Nashik) मालेगावला (Malegaon) रवाना होतील. उद्या ते उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे (Maharashtra Flood) नुकसान झालेल्या भागाची पहाणी करणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्याचा दौरा करतील आणि जिल्ह्यातील विविध भागांची पहाणी करतील. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्व आहे.

 

नुकतीच आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) देखील शिवसंवाद यात्रा काढली होती. या यात्रेत केंद्र स्थानी राहीला तो नाशिक जिल्हा आणि संभाजीनगर. या दोन्ही जिल्ह्यात आदित्यंच्या सभेला तसेच रॅली ला मोठी गर्दी बघायला मिळाली. दरम्यान बंडखोर आमदार सुहास कांदेसह (Suhas Kande) संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) अशा बड्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रीया ही आल्यात. म्हणून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. तरी दरम्यान या दौऱ्यात मुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी काय मोठ्या घोषणा करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे हा वाचा:-State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील लवकरच महाराष्ट्र दौरा (Maharashtra Daura) करणार आहेत, अशी माहिती खुद्द उध्दव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या सामनाच्या (Saamana) मुलाखती दरम्यान दिली. म्हणजे पुढील काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय दौऱ्याचा धडाका बघायला मिळणार आहे हे तेवढं पक्क पण या विविध दौऱ्यांमधून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच राज्यातील जनतेसह आमदारांना देखील मंत्री मंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार असा प्रश्न पडला आहे. जवळपास गेल्या एक महिन्यापासून राज्याचा संपूर्ण कारभार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) बघत आहेत. तरी लवकरच संबंधीत निर्णय व्हावा अशी संपूर्ण राज्याची अपेक्षा आहे.