शिवसेना (UBT) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बुधवारी मुंबईतील दादर परिसरात अपघात झाला. दादर परिसरात आदित्य ठाकरे यांच्या एसयूव्हीला एका दुचाकीने धडक दिली. शिवसेना भवनाजवळ झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आदित्य ठाकरे एसयूव्हीमध्ये बसले होते आणि दुसरे कोणीतरी गाडी चालवत होते. मात्र, उजवीकडे वळण घेण्यासाठी वाहनाचा वेग कमी झाल्याने दुचाकीने एसयूव्हीला धडक दिली. एसयूव्हीची धडक बसल्याने 28 वर्षीय दुचाकी चालक जमिनीवर पडला. मात्र, त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

दुचाकी चालकाला शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकीचालक अमित अंझारा याच्याविरुद्ध रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम 279 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पुढचे 4-5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, बीएमसीचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)