मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई महापालिकेनेही इशारा दिला आहे की, आजपासून पुढील ४-५ दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सखल भागांना भेटी द्याव्यात आणि पूर येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, असे बीएमसीने म्हटले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई उपनगर, लागूनच असलेल्या ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. दुसऱ्या बाजूला उर्वरीत महाराष्ट्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज आणि पुढचे दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता)
ट्विट
There is a possibility of heavy to very heavy rainfall in Mumbai in the next 4-5 days beginning today. It is hereby directed that all concerned officers must visit low-lying areas in their jurisdiction where there is a possibility of flooding and take prompt necessary action:…
— ANI (@ANI) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)