
मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तरुणाने आत्महत्या का केली याबद्दल कळू शकले नसून सहार पोलिस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय सारस्वत असे तरुणाचे असून तो गाजियाबाद येथील राहणारा आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याने घरातून गायब झाला होता. तसेच अक्षयच्या घरातील मंडळी त्यानंतर त्याचा शोध घेत होते. मात्र शनिवारी रात्री त्याने नातेवाईकांना विमानतळावरील टर्मिनस-2 येथे बोलावून घेतले. त्यावेळी अक्षयने त्यांच्या समोर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन खाली उडी घेत आपले आयुष्य संपवले.(कोल्हापूर- तिरुपती विमानसेवेला आजपासून सुरुवात, नियमित आठ विमाने उड्डाण करणार)