कोल्हापूर- तिरुपती विमानसेवेला आजपासून सुरुवात, नियमित आठ विमाने उड्डाण करणार
संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

कोल्हापूर (Kolhapur)- तिरुपती (Tirupati) विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. ही सेवा इंडिगो (IndiGo) कंपनीकडून सुरु करण्यात आली असून दररोज कंपनीची आठ विमाने उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

इंडिगो कंपनीची कोल्हापूर-तिरुपती सेवा दोन्ही मार्गावर सुरु करण्यात आली आहे. तसेच दररोज आठ विमाने उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत कोल्हापूर-मुंबई मार्गावर टू जेट आणि घोडावत ग्रुपचे स्टार एअर यांना विमानसेवेसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर- तिरुपती विमानसेवेला आजपासून सुरुवात,नियमित आठ विमाने उड्डाण करणार('अपाची' अत्याधुनिक पद्धतीचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल)

तर सकाळी 9.45 मिनिटांनी कोल्हापूर येथून तिरुपती येथे जाण्यासाठी पहिले विमान असणार आहे. तसेच तिरुपती येथून दुपारी 1.10 वाजता विमान उड्डाण करुन कोल्हापूरात येणार आहे.