'अपाची' अत्याधुनिक पद्धतीचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल
Apache Guardian attack helicopter (Photo Credits-ANI)

भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) ताफ्यात 'अपची' (Apache) हे अत्याधुनिक पद्धतीचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे. यामुळे आता शत्रूवर घात करण्यासाठी हवाई दलाची ताकद अधिक मजूबत होणार आहे. भारताने अमेरिका सोबत 22 हेलिकॉप्टरचा करार केला आहे. तर अॅरिझोना येथील उत्पादन तळावर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे हे हेलिकॉप्टर सोपवण्यात आले आहे.

अपाची हे जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान असल्याचे म्हटले जाते. यामुळे आता हवाई दलाची ताकद अधिक मजबूत होणर आहे. त्यातसोहत पाठणकोट आणि आसाम येथील जोरहाटमध्ये हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत. येत्या 2020 पर्यंत भारतीय हवाई दलालात 22 अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात येणार आहेत. जूलै महिन्यात याची पहिली बॅच हवाई दलाला मिळणार आहे.(भारतीय हवाई दलाने रोखले पाकिस्तानचे Antonov AN-12 विमान, जयपूर विमानतळावर विमानचालकाची चौकशी सुरु)

तर अपाचीच्या 22 पैकी 11 हेलिकॉप्टर हे एएनय/एपीजी-79 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमची असणार आहेत. तसेच ठराविक अंतरावरुन शत्रूवर अचूक हल्ला करणे आणि शत्रूच्या जमिनीवर सुद्धा हे हेलिकॉप्टर काम करु शकते ऐवढी यांची क्षमता आहे.