भारतीय हवाई दलाने रोखले पाकिस्तानचे Antonov AN-12 विमान, जयपूर विमानतळावर विमानचालकाची चौकशी सुरु
Representational image | (Photo Credits: PTI)

भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) फायटर जेट्सने पाकिस्तानी हवाई हद्दीतून (Pakistani Air Space) भारतीय हवाई हद्दीकडे प्रवेश करणाऱ्या एका विमानाला रोख लावत जयपूर (Jaipur) विमानतळावर (Airport) उतरण्यास भाग पाडल्याचे वृत्त आहे.

भारतीय हवाई दलाच्या लढावू विमानाने जयपूर विमानतळावर उतरवलेले हे विमान Antonov AN-12 या प्रकारातील आहे. तसेच, हे विमान मालवाहक असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीतून भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करत असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तवाहिणीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. (हेही वाचा, भारतीय वायुसेनेचे AN-32 हे विमान मुंबई विमानतळावर घसरले; मोठी दुर्घटना टळली)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट व्हिडिओ

विमानातील वैमानिकाची (पायलट) चौकशी केली सुरु आहे. असे सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहिती प्राप्त होताच सवीस्तर वृत्त लवकरच दिले जाईल.