भारतीय वायुसेनेचे AN-32 हे विमान मुंबई विमानतळावर घसरले; मोठी दुर्घटना टळली
IAF AN-32 Aircraft | Image Used For Representational Purpose | (Photo Credits: PTI)

भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) AN-32 हे बंगळुरुच्या दिशेने उड्डाण करणारे  एअरक्रॉफ्ट मुंबई विमानतळावरुन घसरले. मात्र मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. तर या दुर्घटनेच्या कारणांचा अधिक तपास वायुसेनेचे अधिकारी करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

ANI ट्विट:

हवाई दलाचं एएन-32 विमान धावपट्टी क्रमांक-27 वर ओव्हररन झालं. मात्र त्यावेळेस त्या भागात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

मार्च महिन्यात राजस्थानातील सिरोही गावात रविवारी मिग-27 हे लढाऊ विमानात दुर्घटनारग्रस्त झाले होते.