कोल्हापूर: भररस्त्यात विनयभंग केल्याने तणनाशक प्राशन करून तरुणीची आत्महत्या; आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Representational Image (Photo Credits: ANI)

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील काही तरुणांनी भररस्त्यात विनयभंग (Molestation) आणि अश्लील शिवीगाळा केल्याने तन नाशक प्राशन करून तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. तरुणीचा विनयभंग केल्याचे समजताचं गावातील लोकांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला चोप दिला आणि घरातील साहित्याची तोडफोड केली. कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे येथे ही घटना घडली.

अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील अशी आरोपीची नावे आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी संतप्त जमावाने आरोपीच्या घरातील वस्तू फोडण्यास सुरुवात केली त्यावेळी अजित पाटील या आरोपीनेदेखील कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नणुन्द्रे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नणुन्द्रे गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Palghar: 65 महिलांवर बलात्कार करुन व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या बस कंडक्टरला बेड्या)

दरम्यान, संशयित आरोपी अजित प्रदीप आणि अक्षय यांनी 23 ऑक्टोबर रोजी कोलोली ते तेलवे रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला अडवून तिचा विनयभंग केला होता. या घटनेमुळे पीडित तरुणीने त्याच दिवशी सायंकाळी तणनाशक प्राशन केलं होतं. त्यानंतर तिच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर गावातील संतप्त जमावाने आरोपीला त्याच्या घरात जाऊन मारहाण केली. या घटनेचा गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना लवकरात-लवकर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वाचा - Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी)

कोल्हापूरमध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर 55 वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. सध्या नणुन्द्रे गावातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पीडित तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.