Palghar: 65 महिलांवर बलात्कार करुन व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या बस कंडक्टरला बेड्या
Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पालघर (Palghar) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक महिलांवर बलात्कार करुन त्याच्या क्लिप्स पॉर्न वेबसाईटवर (Porn Website) टाकल्याप्रकरणी एका टीएमसी बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मिलिंद झाडे (Milind Zade) (32) असे या आरोपीचे नाव असून तो पालघर येथील विक्रमगड (Vikramagad) येथील रहिवासी आहे. उच्च शिक्षित मिलिंद पैसे कमवण्यासाठी हे काम करत होता. डिसेंबर महिन्यापासून तो या कामात गुंतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पैसे कमवण्यासाठी झाडे याने वेगवेगळ्या महिलांसोबत तब्बल 65 व्हिडिओ क्लिप्स फॉरेन-बेस्ड पॉर्न वेबसाईटवर टाकल्या आहेत. लॉकडाऊन काळात पैसे कमवण्यासाठी त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्धवस्त केले, असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत दोन महिलांनी पुढे येत मिलिंद विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन देत त्याने महिलांशी जवळीक साधत बलात्कार केला. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या आणि पॉर्न साईटवर अपलोड करत केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे..

एका पीडितेच्या नातेवाईकाने व्हिडिओ क्लिप पॉर्न साईटवर पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याबद्दल महिलेला कुटुंबियांनी विचारले असता तिने सांगितले, झाडे यांनी मैत्रीपूर्वक वागणूक देत पालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या घरी नेले आणि बलात्कार केला. दरम्यान, त्याची क्लिप बनवून पॉर्न साईटवर अपलोड केली आणि या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. त्यानंतर पीडितेने कुटुंबियांसह विक्रमगड पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली. (Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी)

दरम्यान, अजून एका पीडितेने वाळीव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही तक्रारीतील आरोपी एकच असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेने अधिक तपासाला सुरुवात केली. त्यानंतर झाडे यांनी तब्बल 65 महिलांचे व्हिडिओज पॉर्न साईटवर अपलोड केल्याचे उघडकीस आले. या व्हिडिओंना हजारो आणि लाखो कमेंट्स आले होते.

पोलिसांनी शोध घेत आरोपीला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस जप्त करण्यात आली आहेत. तसंच त्याचे कॉल डिटेल्सही तपासण्यात येणार आहेत.