Accident On Pune-Solapur National Highway: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) दौंड तालुक्यातील वाखरी गावात सिमेंट बलकर (Cement Bulker) आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या दुर्दैवी घटनेत सारिका शिलवंत गायकवाड (वय 40, रा. हातोसी, जि. निलंगा, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती शांताकुमार गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वाखरी गावातील शेळके वस्तीजवळ ही घटना घडली. हे दाम्पत्य पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून त्यांच्या कारमधून घराकडे जात होते. ते शेळके वस्तीजवळ आले असता भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारला एका नियंत्रणाबाहेरील बलकरने धडक दिली. धडकेने कारचे मोठे नुकसान झाले. (हेही वाचा -Gas Cylinder Blast in Santacruz: सांताक्रूझमध्ये आगीच्या घटनेत गॅस सिलिंडरचा स्फोट; 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी)
स्थानिक नागरिकांनी या दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गंभीर दुखापत आणि रक्तस्रावामुळे सारिका यांचा वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर शांताकुमार गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Pune Shocker: वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुणे येथील धक्कादायक प्रकार; आरोपीस अटक)
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी. कापरे यांनी घटनेची माहिती दिली असून अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.