Gas Cylinder Blast in Santacruz: सांताक्रूझमध्ये आगीच्या घटनेत गॅस सिलिंडरचा स्फोट; 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gas Cylinder Blast in Santacruz: सांताक्रूझमध्ये आज शनिवारी आगीची घटना घडली. ज्यात नंतर एक 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी झाला आहे. आंबेवाडी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी कामगारांनी निवाऱ्यासाठी उभारलेल्या झोपडपट्टीत पहाटे आग लागली होती. ही आग स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरपर्यंत जाऊन पोहोचली. ज्याचा नंतर स्फोट (Gas Cylinder Blast)होऊन त्यात एका 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी (Injured)झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार रोडवरील आंबेवाडी परिसरात ही घटना घडली. (हेही वाचा:Fake Job Scam in Maharashtra: नोकरी घोटाळा, तोतया RPF जवानास अटक; खोटी नाकरी, खोटे प्रशिक्षण )

"बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी असलेल्या झोपडपट्टीत आग लागली. तेथे उपस्थित असलेल्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली, आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नान असतानाच अचानक आग सिलिंडरपर्यंत जाऊन पोहोचली आणि काही समजण्याआधीच स्फोट झाला," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबतची माहिती मिळताच पाण्याचा टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.